Posts

Showing posts from January, 2022

आईच्या आणि बाळाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी - गर्भिणी योगा

Image
पूर्वीच्या काळी स्त्रीला घरातील सर्व लहान मोठी कामे करावी लागत असत . त्यामुळे शरीरात लवचिकता आणण्यासाठी वेगळ्या व्यायाम करण्याची सहसा गरज भासत नसे . आजच्या काळात मात्र सर्व कामे बोटाच्या इशाऱ्यासरशी होत असल्याने एकंदर लवचिकताच कमी झालेली आढळते . शिवाय प्रसूतीच्या वेळी लागणारे बरेच महत्त्वपूर्ण स्नायू दैनंदिन हालचालीमध्ये उपयोगात आणले जातीलच असे नाही . प्रसूतीच्या क्रियेत शरीरातील अनेक स्नायूंचा उपयोग करावा लागतो . प्रसूती म्हटले की बहुतेक सर्व जण फक्त पोट व कटीविवराच्या स्नायूंवरच लक्ष देतात . पण खरे तर मांड्या , पाठ , मान इतकेच नाही तर अगदी चेहऱ्याच्या स्नायूंचा सुद्धा प्रसवाच्या वेळी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष हातभार लागत असतो . त्यामुळे स्त्रीला सहज प्रसूतीच्या दृष्टीने विशिष्ट व्यायाम करण्याची नितांत गरज असते . फार आराम केल्याने व रोजची कामे टाळल्याने नैसर्गिक प्रसूती होण्याची शक्यता कमी कमी होत जाते . गर्भवतीने घरातील रोजची साधी कामे व गर्भारपणात करावयाचे विशेष व्यायाम आव...