सुप्रजनन आणि गर्भसंस्कार काळाची गरज
जगात आज प्रचंड प्रमाणात हिंसाचार , अनैतिकता वाढली आहे . सर्वच क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे . जल , वायू , अन्नधान्य आपल्या सभोवतालचे वातावरण प्रदूषित झाले आहे . अशा सर्व परिस्थितीवर मात करून तग धरून राहण्यासाठी येणारी पिढी ही सत्ववान , बुद्धिमान , आरोग्यसंपन्न असायलाच हवी . त्यातून पूर्वीच्या काळाप्रमाणे भरपूर अपत्ये न होता एकच संतती हवी अशी विचारधारा असल्याने होणारी संतती सर्वच दृष्टीने श्रेष्ठ हवी अशी इच्छा असतेच . अपत्य जन्माला येणे आणि ते चांगले निघणे ही एका तऱ्हेने गुंतागुंतीची प्रक्रिया आहे कारण ती अनेक घटकांवर आधारलेली आहे . म्हणून ही प्रक्रिया अधिकाधिक चांगली करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा . मुले चांगली निपजण्याचे शास्त्र म्हणजे सुप्रजनन . ( युजेनिक्स ) ...