सुप्रजनन आणि गर्भसंस्कार काळाची गरज
जगात आज प्रचंड प्रमाणात हिंसाचार, अनैतिकता वाढली आहे. सर्वच क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. जल, वायू, अन्नधान्य आपल्या सभोवतालचे वातावरण प्रदूषित झाले आहे. अशा सर्व परिस्थितीवर मात करून तग धरून राहण्यासाठी येणारी पिढी ही सत्ववान, बुद्धिमान, आरोग्यसंपन्न असायलाच हवी. त्यातून पूर्वीच्या काळाप्रमाणे भरपूर अपत्ये न होता एकच संतती हवी अशी विचारधारा असल्याने होणारी संतती सर्वच दृष्टीने श्रेष्ठ हवी अशी इच्छा असतेच. अपत्य जन्माला येणे आणि ते चांगले निघणे ही एका तऱ्हेने गुंतागुंतीची प्रक्रिया आहे कारण ती अनेक घटकांवर आधारलेली आहे. म्हणून ही प्रक्रिया अधिकाधिक चांगली करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. मुले चांगली निपजण्याचे शास्त्र म्हणजे सुप्रजनन. (युजेनिक्स)
सुप्रजनन यासाठी पूर्वीच्या काळापासून प्रयत्न चालू आहेत. अशा प्रकारचा प्रयत्न झाल्याचा दाखला २३०० वर्षे मागे प्लेटोच्या काळापर्यंत जातो. प्लेटो आणि त्याचा शिष्य अॅरिस्टॉरल यांच्या तत्त्वज्ञानाचा पगडा आजही आहे. चांगल्या प्रजेच्या निर्मितीसाठी त्यांनी केलेले नियम व कायदे प्लेटोच्या "Republic and
laws" या ग्रंथात पहावयास मिळतात.
चांगले मुल जन्माला येण्यासाठी चांगल्या बीजाची आवश्यकता असते.
"शुद्ध बिजापोटी ! फळे रसाळ गोमटी !!"
मानवाच्या दृष्टीने चांगले बीज म्हणजे पुरुषाचे शुक्राणू (स्पर्म) व स्त्री बीज.
हार्मन मुलर या नोबेल प्राइज विजेत्या शास्त्रज्ञाने 'स्पर्म बँक' ची कल्पना प्रथम मांडली व ती प्रत्यक्षात आणली १९८० साली 'रॉबर्ट ग्रहम' या संशोधक व उद्योगपतीने. त्याने या बँकेत नोबेल पारितोषिके मिळवणाऱ्या व्यक्तींचे स्पर्म गोळा करायला सुरुवात केली. ज्या स्त्रीमध्ये या स्पर्मचे रोपण व्हायचे असेल ती स्त्रीसुद्धा बुद्धिमान, सुंदर व निरोगी हवी असा त्याचा कटाक्ष असे. ग्रॅहमच्या स्पर्म बँकेचा लाभ अनेक लोकांनी घेतला. या स्पर्म बँकेच्या द्वारा १९८०-१९८२ या काळात निर्माण झालेली मुले इंग्लंड, जर्मनी, कॅनडा, इटली, इजिप्त अशी पसरली आहेत. याचा निष्कर्ष हाती आला तो म्हणजे ग्रॅहमच्या कल्पनेतली त्यांना अपेक्षित असलेली बालके निर्माण झाली नाहीत.
आता वैज्ञानिक प्रगतीमुळे युजे निक्सचा नवीन प्रकार येऊ पाहात आहे तो म्हणजे 'डिझाइनर बेबी' चा. चांगल्या अपत्याच्या निर्मितीसाठी त्याच्या गुणसुत्रामध्येच विज्ञानाच्या जोरावर बदल करून 'आम्ही फक्त चांगलीच प्रजा निर्माण करू' अशी ही संकल्पना आहे. पण निसर्गामध्ये 'फक्त चांगले' हे वेगळेपणाने राहू शकेल का? कॉम्प्लिमेंटॅरिटीच्या नियमाप्रमाणे प्रत्येक गोष्टीबरोबर त्याच्या विरुद्ध गोष्ट निर्माण होत असते. त्यामुळे फक्त चांगले किंवा फक्त वाईट असे वेगळेपणाने राहू शकत नाही. तर मग चांगल्या प्रजेच्या निर्मितीसाठी प्रयत्न कसे करावेत? असा प्रश्न पडेल त्यादृष्टीने पौर्वात्य भारतीय संस्कृतीने 'सुप्रजनन' याबद्दल कसा विचार केला आहे हे समजून घेणे उदबोधक ठरेल.
'सुप्रजनन' ही संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये वेद काळापासून चालत आलेली दिसते. ऋग्वेद व अथर्ववेद यात सुप्रजनन आणि गर्भसंस्कार यासंबंधीची माहिती आढळते. हजारो वर्षापूर्वी पिप्पलाद ऋषींनी 'गर्भोपनिषद' लिहिले त्यामध्ये गर्भासंबंधीची सर्व माहिती ऋचाबद्ध केलेली आहे. आणि आयुर्वेदात तर याचा सखोल व शास्त्रशुद्ध विचार केलेला आहे.
गर्भसंस्कार म्हणजे काय आणि ते कसे करावेत?
व्हिडिओ साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/pjgPLfulE9I
Comments
Post a Comment