गर्भसंगीत आणि गर्भवती
माणसाच्या मनात ताण निर्माण झाला असता त्याच्याशी सामना करण्याची निसर्गाने योजना केली आहे . ताणाचा सामना करण्यासाठी शरीरात कॉर्टिसॉल या हार्मोन्सची निर्मिती होते . त्यामुळे ताणाचा सामना करण्याची शक्ती येते . पण त्याच वेळेस शरीरातल्या अन्य प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो . विशेषतः स्वसंरक्षक प्रणाली , पुनरुत्पादनाची प्रक्रिया आणि आकलनाची प्रक्रिया (cognitive performance) कमी होतात . वंध्यत्वात (Infertility) वाढ होते . थोडक् यात ताण कमी करण्यासाठी शरीराने मोजलेली ही किंमत आहे . प्रदीर्घ ताणामुळे कॉर्टिसॉल जास्त प्रमाणात सोडले जाते व ...