गर्भसंगीत आणि गर्भवती
माणसाच्या मनात ताण निर्माण झाला असता त्याच्याशी सामना करण्याची निसर्गाने योजना केली आहे. ताणाचा सामना करण्यासाठी शरीरात कॉर्टिसॉल या हार्मोन्सची निर्मिती होते. त्यामुळे ताणाचा सामना करण्याची शक्ती येते. पण त्याच वेळेस शरीरातल्या अन्य प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. विशेषतः स्वसंरक्षक प्रणाली, पुनरुत्पादनाची प्रक्रिया आणि आकलनाची प्रक्रिया (cognitive performance) कमी होतात. वंध्यत्वात (Infertility) वाढ होते. थोडक्यात ताण कमी करण्यासाठी शरीराने मोजलेली ही किंमत आहे. प्रदीर्घ ताणामुळे कॉर्टिसॉल जास्त प्रमाणात सोडले जाते व त्याचा परिणाम मेंदूमधील हिपोकॅम्पस वर होतो. हिपोकॅम्पस मधील न्यूरॉन्सची संख्या कमी होते.
अशा प्रकारचा ताण गर्भवती महिलांवर प्रदिर्घ टीकला असेल तर परिस्थिती आणखी बिकट होते. ताण असलेल्या किंवा निर्माण केलेल्या गर्भवती उंदीर मातांवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, त्यांच्या प्रजे मध्ये अवकाशीय स्मृती कमी होते. व तसा बदल मेंदूच्या रचनेत होतो. हिपोकॅम्पस मधील पेशींची वाढ होत नाही. व त्या लवकरच वृद्ध होतात, थकतात. निष्कर्ष असा की गर्भ पूर्व ताणामुळे न्यूरो जेनेसिस ची प्रक्रिया मंदावते.यावर उपाय म्हणजे गर्भावस्थेत संगीतोपचार करायचा. संगीतामुळे न्यूरो जेनेसिस ची प्रक्रिया चांगली होऊ शकते.
गर्भसंगीताचा फायदा गर्भवती मातेला सुद्धा होतो गर्भ काळात मातेने संगीत ऐकल्यामुळे तिच्यावरचा ताण, नैराश्य कमी होण्यास मदत होते. गर्भ काळात हार्मोन्सच्या असंतुलनामुळे मातेला दोन वेळा नैराश्य येण्याची शक्यता असते. एकदा ती गर्भवती असताना व दुसऱ्यांना डिलेवरी नंतर त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. गर्भ संगीतामुळे हे सर्व मानसिक त्रास कमी होण्यास मदत होते.
तैवान येथे केलेल्या एका संशोधन प्रकल्पात दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील सुमारे दोनशे त्रेसष्ठ गर्भवती मातांवर प्रयोग करण्यात आले. संशोधनाच्या आवश्यकतेप्रमाणे सर्व गर्भवती माता मध्ये शैक्षणिक पात्रता, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती इत्यादीबाबत सारखेपणा असल्याची खात्री केली. यापैकी सुमारे निम्म्या गर्भवती मातांना रोज अर्धा तास संगीताची सीडी ऐकण्यासाठी देण्यात आली. या संगीतामध्ये शास्त्रीय संगीत, निसर्ग संगीत, लहान मुलांची गाणी इत्यादीचा समावेश होता. उरलेल्या निम्म्या गर्भवती स्त्रियांना अशा प्रकारचे संगीत ऐकण्यास दिले नाही. परंतु दोन्ही ग्रुपना प्रसुतीपूर्व काळजी, औषधे, आहार इत्यादी सारखे देण्यात आले होते. सुमारे दोन आठवड्यांनी त्यांनी या दोन्ही ग्रुप मध्ये नैराश्य, ताण, चिंता किती प्रमाणात आहेत याची चाचणी केली. त्यांना असे दिसून आले की ज्यांनी संगीत ऐकले होते त्यांची नैराश्य, चिंता व ताण यांची पातळी खूपच कमी झाली होती. विशेष म्हणजे केवळ दोन आठवड्याच्या संगीत ऐकन्यामुळे हा फरक दिसून आला.
आपल्या येणाऱ्या बालकांसाठी गाणे म्हणण्याची पद्धत सर्व जगभर प्रचलित होती. मुलांना भाषाशास्त्राचे ज्ञान हे पहिल्यांदा संगीतामधूनच दिले जाते. 'मातृभाषा' हा शब्द कदाचित याच गुणविशेषामुळे आला असावा. संगीतशास्त्र व भाषाशास्त्र यामध्ये संशोधन करणारे व्हाईटवेल यांच्या मते पूर्वी संवाद हेच संगीतरूपात होते. त्यामुळे भाषा किंवा संभाषण अगोदर संगीत आले असावे.संगीत कळण्यासाठीही भाषेची मर्यादा नाही म्हणजे भाषा कळण्या अगोदर त्याला संगीत कळू शकते. संवादापेक्षा संगीतामध्ये उच्चश्रेणींची कंपनसंख्या असते.
संगीत गर्भावस्थेत ऐकवले गेले तर त्याचा परिणाम अधिक चांगला होण्याची शक्यता शास्त्रज्ञांना लक्षात आली. त्यादृष्टीने त्यांनी प्रयोग केले. मानवी गर्भावर प्रयोग करण्यात अडचणी असतात शिवाय त्याचे परिणाम मिळण्यात अनेक वर्ष ही लागतात. म्हणून त्यांनी उंदरांवर प्रयोग केले. गरोदर उंदीर मातांच्या एका गटाला त्यांनी रोज एक तास संगीत ऐकवले व दुसऱ्या गरोदर उंदीर मातांना गोंगाट ऐकवला व तिसऱ्या गटाला काहीच ऐकवले नाही. हे सर्व उंदीर जन्माला आल्यावर त्यांनी एक चाचणी घेतली. प्रयोगासाठी एक भूल भुलैया तयार करून त्यात त्यांनी उंदरांसाठी खाऊ ठेवला. भुलभुलय्यातील (maze) खाऊ शोधण्यासाठी त्या उंदरांना किती वेळ लागतो हे परिणाम होते. त्यांना असे लक्षात आले की ज्यांना संगीत ते गर्भात असताना ऐकवले गेले होते त्यांना हा खाऊ पटकन शोधता आला, कमी वेळ लागला. तर ज्यांना गोंगाट ऐकवला गेला होता किंवा तिसऱ्या नियंत्रित गटाला काही ऐकले गेले नव्हते त्यांना तो खाऊ शोधायला खूप वेळ लागला. यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की, गर्भात असताना संगीत ऐकल्यामुळे त्यांची (Spatial memory) अवकाशीय स्मृती वाढते. अवकाशीय म्हणजे ज्यामध्ये कल्पनाशक्तीचा वापर करावा लागतो ते. उदा. मॅप रिडिंग, नकाशा चे वाचन व आकलन. गुगल मॅप वरून प्रत्यक्ष जागा शोधणे यासारखा प्रकार. ती अवकाशीय स्मृती वाढते.
अशाच प्रकारचा निष्कर्ष त्यांनी कोंबड्यांच्या अंड्यांवर व त्यातून जन्मलेल्या पिल्लांवर केलेल्या प्रयोगातही आढळला.
शास्त्रीय संगीताची जननी म्हणून वेदांकडे पाहिले जाते. चार वेदांपैकी 'सामवेदा' कडे संगीताचे पालकत्व जाते. दुसरे असे की, वेद ही अपौरुषेय मानले गेले आहेत त्यामुळे असे हे दैवी संगीत येणाऱ्या जीवाला निश्चितच चांगला आकार देईल.'मंत्रशक्ती' ही एक भारतीयांना लाभलेली विशेष देणगी आहे. 'मन ठिकाणावर ठेवायला मदत करतो तो मंत्र अशी मंत्रांची व्याख्या आहे. मंत्रांमध्ये संगीत आहे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचा आशय आहे म्हणून मंत्र ही भारतीय संस्कृतीला मिळालेली एक प्रकारची देणगी आहे. गर्भ संस्कारांमध्ये मंत्राचाही सहभाग महत्त्वाचा आहे.
गर्भावरील आदर्श संस्कार “ध्वनी”च्या माध्यमातून सर्वात प्रभावीपणे होऊ शकतात. कारण मंत्र, संगीत असा कोणत्याही प्रकारचा ध्वनी आणि त्यातील अर्थ मन व बुद्धीने तर ग्रहण होतोच; परंतु ध्वनिलहरींची कंपने प्रत्यक्षपणे ही माता व गर्भ दोघांवरही परिणाम करतात. त्यामुळेच गर्भसंस्कारसंगीताचा उपयोग गर्भाचे आरोग्य, जन्माला येणाऱ्या बालकाचे व्यक्तिमत्व या दोहोंसाठी अतिशय चांगला होतो.
Comments
Post a Comment