Posts

Showing posts from May, 2022

गर्भवतीसाठी पोषक आहार

Image
गर्भारपणातील आहाराबाबत मार्गदर्शन करतांना आर्युवेदशास्त्र कसलाही अतिरेक न करण्याचा सल्ला देते. गोड आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट या षडरसांनी युक्त आहार असावा हे खरे. गर्भारपण हा गर्भवतीचा कोडकौतुकाचा काळ आहे हे खरे या काळात स्त्री आपले आवडते पदार्थ खाण्यावर भर देते. मात्र हे पदार्थ एक दोनच असतील तर तेच ते पदार्थ खाण्याने लाभापेक्षा नुकसान होण्याची शक्यता जास्त. शिवाय या काळात पदार्थ आवडीचे असण्याइतकेच ते षडरसपूणॆ, स्वतःसाठी आणि गर्भातल्या बाळासाठी पोषक असणे आवश्यक असते. आहारातील पदार्थ, वेळा, त्यांचे पोषणमूल्य यांची लिखीत नियमावली आपल्या पूर्वजांनी अनुभवाने लिहूनच ठेवली आहे. तिचे अनुकरण करणे बाळासाठी चांगले आहेच, त्याबरोबरच स्वतःसाठी उपयुक्त आहे. बाळंतपणानंतरचे आजार, केस गळणे, शरीर बेढब होणे, कंबर सुटणे, काळवंडणे आदी प्रकार त्यामुळे टाळता येतात. थोडक्यात आवडते किंवा खावेसे  वाटते म्हणून कुठल्यातरी एकाच चवीचा अतिरेक न करता आहार संतुलित आणि प्रकृतीला अनुकूल असा ठेवावा. गर्भिणीने गरोदर अवस्थेत स्वतःच्या पोषणाबरोबरच गर्भाचे योग्य पोषण होण्यासाठी, स्वत:चे बल टिकून राहण्यासाठ...