जन्मपूर्व संस्कार - जागतिक प्रयत्नांचा आढावा
भारतामध्ये जन्मपूर्व संस्काराचा बराच मोठा इतिहास आहे. अभिमन्यूच्या उदाहरणाने तो महाभारत काळापर्यंत मागे गेलेला आहे. सध्याच्या विज्ञानयुगात एकविसाव्या शतकात मागोवा घेतांना असे दिसते की, जेथून सुरुवात झाली त्या भारतात त्या मानाने जन्मपूर्व संस्काराबद्दल कमी जाणीव आहे, तर जगात इतरत्र मात्र याबाबतीत बराच शास्त्रशुद्ध प्रयत्न करण्यात येत आहे. अशा प्रकारचा प्रयत्न कोणी व कुठे केला आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. जन्मपूर्व अवस्थेत गर्भाला कळू शकते अशा प्रकारच्या विधानाला पुष्टी देणारे वैज्ञानिक संदर्भ (पेपर्स) काही प्रमाणात माहिती (डाटा) प्रयोग हे १९४० पासून अधूनमधून प्रसिद्ध होत होते पण याबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनातून खरी सुरुवात किंवा अशा प्रकारचा प्रयत्न, प्रथम सुमारे १९६४ सालापासून लोणावळे येथील न्यू वे आश्रमात सुरू झाला. भारतातील उगवत्या पिढीला गर्भातच घडविण्याची प्रक्रिया लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यातून सुरू झाले. १) असोसिएशन फाॅर प्रि अँड पेरिनॅटल सायकॉलॉजी अँड हेल्थ:- जन्मपूर्व व व जन्म उत्तर अवस्थेमधील शारीरिक वाढ व मानसशास्त्र याबद्द...