गर्भसंस्काराचे ज्ञान-विज्ञान
'गर्भसंस्कार' म्हणजे खूप काही अवघड, वेगळे असे नसून उद्याच्या बुद्धिमान, आरोग्यसंपन्न, व चारित्र्यवान संतती साठी गर्भवती स्त्रीने स्वीकारायची सुसंस्कारित आचार पद्धती आहे. 'संस्कारोहीगुणांतरधानं !' एखाद्या वस्तूचे, गोष्टीचे गुण बदलणे, रूपांतरच करणे म्हणजे 'संस्कार' होय. संस्कार म्हणजे शुद्ध करणे. चांगल्या गुणांचे वर्धन व दोषांचा भागाकार म्हणजे संस्कार.लोण्यावर अग्नीचा संस्कार झाल्याने त्याचे रुपांतर तुपामध्ये होते. त्याच पद्धतीने गर्भाचे विविध अवयव तयार होत असताना ते अवयव अर्थात तो गर्भ चांगल्या दर्जाचा तयार व्हावा यासाठी केले जाणारे प्रयत्न, अर्थात संस्कार म्हणजेच “गर्भसंस्कार” होत. गर्भ धारणेसाठी स्त्री बीज आणि पुरूष बीज यांचा संयोग आवश्यक आहे, हे जेवढे खरे तेवढेच त्या संयोगातून गर्भ निर्मीती होण्यासाठी जीवाचे, अर्थात चेतनतत्वाचे अस्तित्व प्रस्थापित होणे हे ही गरजेचे आहे. चैतन्याच्या पाठोपाठ येते ते मन. फलन (फर्टीलायझेशन) झाल्याच्या क्षणापासून गर्भ मनानेयुक्त असतो आणि या मनावर पूर्व जन्मातील चांगल्या वाईट कर्मांचे संस्कारअसतात. गर्भाचे मन आपल्या आई-वडिलांच्या ...