गर्भसंस्काराचे ज्ञान-विज्ञान
'संस्कारोहीगुणांतरधानं !'
एखाद्या वस्तूचे, गोष्टीचे गुण बदलणे, रूपांतरच करणे म्हणजे 'संस्कार' होय. संस्कार म्हणजे शुद्ध करणे. चांगल्या गुणांचे वर्धन व दोषांचा भागाकार म्हणजे संस्कार.लोण्यावर अग्नीचा संस्कार झाल्याने त्याचे रुपांतर तुपामध्ये होते. त्याच पद्धतीने गर्भाचे विविध अवयव तयार होत असताना ते अवयव अर्थात तो गर्भ चांगल्या दर्जाचा तयार व्हावा यासाठी केले जाणारे प्रयत्न, अर्थात संस्कार म्हणजेच “गर्भसंस्कार” होत.
गर्भ धारणेसाठी स्त्री बीज आणि पुरूष बीज यांचा संयोग आवश्यक आहे, हे जेवढे खरे तेवढेच त्या संयोगातून गर्भ निर्मीती होण्यासाठी जीवाचे, अर्थात चेतनतत्वाचे अस्तित्व प्रस्थापित होणे हे ही गरजेचे आहे. चैतन्याच्या पाठोपाठ येते ते मन. फलन (फर्टीलायझेशन) झाल्याच्या क्षणापासून गर्भ मनानेयुक्त असतो आणि या मनावर पूर्व जन्मातील चांगल्या वाईट कर्मांचे संस्कारअसतात.
गर्भाचे मन आपल्या आई-वडिलांच्या विशेषतः आईच्या मनाशी संबंधित असते, गर्भवती स्त्रीज्या प्रकारच्या कथा-वार्ता ऐकेल, जे काही गीत-संगीत ऐकेल त्याच्या अनुसार बाळाचे मन घडत जाते. जे काही गर्भवती एक चित्त होऊन ऐकेल ते सर्व गर्भाच्या मनावर संस्कारकरीत असे.
शूर, हुशार, सुंदर व निरोगी गर्भाची इच्छा असणाऱ्या गर्भिनीने गर्भावस्थेत तशा गुणांनी युक्त आदर्श व्यक्तींच्या कथा ऐकाव्यात, त्यांचे जीवन चरित्र वाचावे, त्यांच्या बद्दल विचार करावा.
आयुर्वेद शास्त्रात स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची अवस्था म्हणजे ‘गर्भिणी अवस्था’ यात तिने कसे वागावे, काय खावे, आपले बाळ निरोगी व सुदृढ होण्यासाठी कशा प्रकारे आहार-विहार व औषध योजना करावी याचा प्रत्येक महिन्यानुसार विचार केलेला आहे. या गर्भिणी-परीचर्येचे पालन केले तर सुदृढ व निरोगी बालक जन्मू शकते.
आयुर्वेदा मध्ये गर्भाच्या मासानु मासिक वाढी नुसार म्हणजेच Fetal development नुसार ज्या महिन्यात ते अवयव तयार होतात. त्या नुसार काही विशिष्ट आहार आणि आचरण सांगितलेले आहे. उदा. गर्भाच्या दुसऱ्या महिन्यात गर्भाच्या लैंगिक अवयवांची वाढ होत असते. आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार सुद्धा Embryo म्हणजे अंकुरात सहाव्या ते आठव्या आठवड्यात त्या विशिष्ट पेशींचे रुपांतर male किंवा female genital organs च्या मूलपेशींमध्ये होत असते. म्हणजेच गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यात जर गर्भवती स्त्रीला पोषक असा आहार आणि काही विशिष्ट आयुर्वेदीय औषधे घ्यायला सांगितली तर पुढे तयार होणारे लैंगिक अवयव इतके चांगल्या प्रतीचे असतील की त्या व्यक्तीस कुठलीही शारीरिक लैंगिक अथवा समस्या येणार नाही.
गर्भसंस्कार शास्त्रा मध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला जातो.थोडक्यात निर्मितीच उत्कृष्ट असेल तर वाढही चांगलीच होणार. जसे इमारत उभी राहण्यासाठी आणि चांगली टिकण्यासाठी तिचा पाया पक्का हवा. त्याच प्रमाणे गर्भवती स्त्रीने केलेला आहार, आचरण, विचार याचा परिणाम तिच्या होणाऱ्या बाळावर दिसून येतो.
गर्भसंस्कार शिबीर म्हणजे एक ज्ञान साधना आहे,आनंद यात्रा आहे,आत्मिक आनंद देणारी प्रक्रिया आहे. आपल्या बाळाला गर्भातच ज्ञान देणाऱ्या मातेचा असीम आनंद शब्दबद्ध करता येत नाही. बाळाला ज्ञान देतांना माता देखील ज्ञानवंत होते.
गर्भसंस्कार झाल्यामुळे आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन, नेतृत्वगुण, अभिव्यक्ती, निर्णयक्षमता, सारांश ग्रहण क्षमता, कल्पना विस्तार क्षमता, चिकाटी, महत्वाकांक्षा, समयसूचकता इ. पैलू बाळाला देता येतात.
जन्मपूर्व अवस्थेत शिक्षण किंवा संस्कार यांचे प्राचीन धर्मशास्त्रातील पुरावे - हिरण्यकश्यपुची पत्नीकया गूला नारदमुनींनी गर्भारपणात दानवां पासून दूर नेऊन नारायणाची भक्ती करण्यासाठी आश्रमात नेऊन ठेवले. आणि दानवाच्या पोटी भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. राणी मदालसा गर्भवती असतांना धर्मचर्चा, धार्मिक आचार करीत असे, गर्भाकडे लक्ष देवून त्याच्या आत्मोन्नतीसाठी उपदेश देत असे. परिणाम स्वरूप पाचही मुलगे तपस्वी झाले व संसारा पासून विरक्त झाले. सहाव्यावेळी राजा ने तिला शूरयोद्धा व राजा होण्यास योग्य गुणांचे रोपण होईल असे संस्कार करण्यास सांगितले आणि तो पुत्र महान सम्राट झाला.
स्वामी विवेकानंद यांनी एकदा त्यांच्या माता भुवनेश्वरीला प्रश्न विचारला होता की, “मी माझ्या जन्माआधी कुठे होतो? तेव्हा त्यांच्या मातेने कौशल्याने त्यांना उत्तर दिले. भुवनेश्वरी यांनी विवेकानंद यांना सांगितले होते की, “तु तुझ्या जन्माआधी माझ्या विचारात होतास.” शिवाय भुवनेश्वरी स्वामी विवेकानंद पोटात असताना ध्यानधारणा करत असत ज्यामुळे त्यांच्या विवेकानंद लहानपणापासून ध्यानविद्या जाणत होते. यावरून गर्भसंस्कारांचे महत्त्व प्राचीनकाळा पासून असल्याचे दिसून येते.
जिजामातेला आपल्या पोटी असा पुत्र व्हावा की जो हिंदवी राज्याची स्थापना करील' अशी तीव्र इच्छा होती. किंबहुना जिजामातेच्या मनातील त्या उत्स्फूर्त आवेगांची स्पंदनेच गर्भस्थ शिवाजीवर सतत पडली असावीत व गर्भातच ती मानसिकता रुजली गेली असावी.
रामायण-महाभारता सारख्या प्राचीन वाड्मयातही “गर्भसंस्कार” केले जात असत हे समजते. रामायणा मध्ये श्रीराम जन्माच्या आधी “पुत्रकामेष्टीयज्ञ” केल्याचे वर्णन सापडते. यज्ञातून प्रकट झालेल्या प्रत्यक्ष अग्निदेवांनी दशरथाला “पायसदान” दिल्याचेहीआपण ऐकतो. हे “पायस” दुसरे तिसरे काही नसून संपन्न गर्भाच्या आकांक्षेने केलेल्या “गर्भसंस्कारा”चाच एक भागआहे.

Comments
Post a Comment