बालसंगोपन
बा ळाचा जन्म ही आनंदाची घटना असली तरी बहुतेक वेळेला नवोदीत मातापिता गोंधळलेले असतात. घरातल्या मोठया स्त्रीयांच्या सांगण्यानुसार त्यांचे बालसंगोपन चालू असते. परंतु आताची विभक्त कुटूंब पध्दती पाहाता प्रत्येक पालकाने स्वतः संगोपनाविषयी माहिती मिळवणे आवश्यक आहे. बाळ रडत असलं की घरातली सगळी मंडळी घाबरुन जातात. बाळाच रडणं हे त्याच्या संवादाच माध्यम आहे. त्याला कदाचित भूक लागली असल्यास, झोप आली असल्यास, उकडत किंवा थंडी वाजत असल्यास, पोटात दुखत (कॉलिक पेन्स) असल्यास.. ह्यापैकी कुठल्याही कारणांसाठी रडतात. बरेचवेळा ही लहान बाळं संध्याकाळच्या वेळेला टीपेचा सूर लावतात. सवयीने पालकांना बाळाच्या रडण्यातला फरक लक्षात येतो. बाळांच हे रडणं समजावून घेतल्यास त्याला शांत करणं सोप जात . नवजात बालकाच्या जन्मापासून ते तीन महिन्यांपर्यंत बाळाच्या बरयाचश्या हालचाली ह्या ‘रिफ्लेक्सईव्ह’ असतात. परंतु बाळ साधारण तीन महिन्याचे झाले की त्याची समज अधिक वाढलेली असते. त्याच्या हनुवटीवर बोट ठेवल्यास, स्तनाचा वास किंवा स्पर्श झाल्यास बाळ आपोआप मान त्या दिशेने वळवते. वातावरणातला फरकही बाळाला कळतो. कपडे किंवा दुपटी बदलतां...