Sunday, November 6, 2022

गर्भाची मासानुमासिक वृद्धी (Fetus Development)

 




गर्भ गर्भाशयात नऊ महिन्यांच्या काळात कसा कसा वाढतो त्याचे निरीक्षण आयुर्वेद शास्त्रज्ञांची अभ्यासाने करून ठेवले आहे. ज्या महिन्यात ज्या गर्भघटकांचे भाव जास्त प्रमाणात पोषित होत असतात, त्या गर्भघटकांची पूर्ती करून गर्भाची वाढ निकोप व्हावी, यासाठी प्रत्येक महिन्याला अनुसरून आहार व औषधोपचारही सांगितले आहेत. मात्र हे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावेत.

गर्भाची मासानुमासिक वृद्धी -

१) प्रथम मास:

“प्रथमे मासि कललं जायते” (सुश्रुत) फलित बीज गर्भाशयात येऊन स्थिरावते व ते पेशीस्वरूपच असते. 


२) द्वितीय मास:

॥ द्वितीये शीतोष्मानिळैर: विप्रपच्यमानानाम्‌  महाभूतानाम्‌ संघातो धन: संजायेते यदि पिण्ड ॥

अर्थात या पेशीस्वरूप बीजाचा आकार मोठा होतो. पेशीविभाजनाची क्रिया सुरू होऊन पेशींचा मोठा गोळा तयार होतो. विभजन ही वाताची क्रिया आहे म्हणून या काळात वातप्रकोप आहार-विहार करू नये. कारण वाताचा प्रकोप झाल्यास हे विभजनाचे कार्य प्राकृत न होता विकृत स्वरूपाचा गर्भ बनेल.


३) तृतीय मास: 

 ॥ तृतीये हस्तपदाशिरसां पंच पिंडकाम ॥

तृतीय (तिसऱ्या) महिन्यात दोन्ही हात, दोन्ही पाय व डोके यांची पिंडे व्यक्त होतात. 

परंतु हे कायम लक्षात ठेवायला हवे की पहिल्या ३ महिन्यात गर्भ हा तसा अस्थिरच असतो. रसस्वरूप असतो; म्हणूनच पहिल्या ३ महिन्यात रसधातु परिपोषण करणे आवश्यक असते. म्हणून न्याहरीला पाव चमचा लोणी + साखर घेऊन वर दूध किंवा आंबेमोहोर तांदुळाच्या कण्याची पेज किवा कणकेची खीर घ्यावी. दुपारी जेवताना भाज्यांचे सूप, मुगाच्य वरणाचे तूप घालून कढण सेवन करावे व दुपारी ऋतुकालानुसार असलेल्या फळांचे रस, शहाळ्याचे पाणी असा द्रव, मधुर, स्निग्ध आहार सेवन करावा. म्हणूनच पहिल्या ३ मासात रसरक्त धातुपरिपोषक असा काढा दिला जातो. उदा. इंद्रयव, यष्टीमधु, अनंतमूळ, लघुमालिनी वसंत- साखरेमध्ये कुटून रात्री जेवणानंतर लोण्यातून बलासाठी देतात.

व्यायाम 

 पहिले ३ महिने गर्भ हा तसा अस्थिरच असल्याने शक्‍यतोवरअतिकष्ट, धावपळ, हादरे बसणाऱ्या वाहनातून प्रवास टाळावा.विशेषत: ज्यांना पूर्वी गर्भपात झालेला आहे, त्यांनी तर विशेष काळजीघ्यावी व बसल्या बसल्या सहज होणारे हाताचे, मानेचे व डोक्याचेव्यायाम तसेच प्राणायाम करण्यास हरकत नाही.


४) चतुर्थ मास :

॥ चतुर्थ सर्वांग प्रत्यय विभाग: प्रव्यक्तो भवति ॥

॥ गर्भ हृदय प्रव्यक्तिभाव चेतना धातु अभिव्यक्तो ॥

अर्थात चौथ्या महिन्यात गर्भाचे सर्वांग प्रत्यंग व्यक्त होतात वहृदयही व्यक्त होते व त्यामुळे गर्भामधील भाव मातेच्या इच्छेद्वारे प्रकटहोत असतात. म्हणूनच चौथ्या महिन्यात गर्भिणीच्या खाण्या – पिण्याच्या इच्छा पुरवाव्यात अर्थात्‌ या इच्छा घातक असतील त्या टाळून त्याबद्दल दुसरे काही योजावे.

उदा. अतितिखट खाण्याची इच्छा झाली तर हिरव्या मिरचीचा ठेचा देऊ नये. तोंडाला चव येईल एवढेच आले किंवा सुंठ पावडर घालून पदार्थ करावा व तो खाण्यास द्यावा. 

ह्या महिन्यामध्ये दोन्ही जेवणांपूर्वी दूध घुसळून काढलेले लोणी गरम भाताबरोबर नियमितपणे सेवन करावे. 

मासानुमासिक काढ्याबरोबर मधुमालिनी वसत साखरेमध्ये खलून लोण्यातून रात्री जेवणानंतर (उदान काली) बलासाठी द्यावा. यातील प्राणीज द्रव्य सहज सात्म्य आहेत. अर्जुनचूर्ण हृदयाला हितकारक शतावरी कल्प व अनंतमूळ रसरक्त धातुपोषक तसेच डाळिंबाचा रस, शहाळ्याचे पाणी दुपारच्या वेळात प्यावे.

व्यायाम  

 गर्भाला स्थिरत्व प्राप्त झालेले असले तरी ताबडतोब दगदग,धावपळ करू नये. घरची रोजची सवयीची कामे करावीत. तसेचचालण्याचा, प्राणायामच व्यायाम करावा. तसेच (Amassfrehing)छातीच्या स्नायूंच्या बळकटीसाठी करावे.


५) पाचवा मास:                                                                                      

॥ पंचमे मन: प्रति बुद्धीतर भवति ॥

मनाची व्यक्ती होते अर्थात जाणीव बुद्धीच्या आधी उत्पन्न होत व ह्या महिन्यात गर्भाचे मांसधातू व रक्तधातू विशेषत्वाने पुष्ट होतात.

म्हणूनच ह्या महिन्यात भाताबरोबर दूध + तूप अधिक प्रमाणात खावे. अळूची भाजी सेवन करावी (अम्लरस). रक्तधातू पोषणासाठी तसेच १ जर्दाळू +२ काळ्या मनुका + ४ बेदाणे एक कप पाण्यात घालून उकळवून अर्धा कप करून त्यात उकळताना पाव चमचा साजूक तूप व चिमूटभर साखर घालून हे सूप दोन्ही जेवणांपूर्वी घ्यावे व नतर त्यातील मनुका, बेदाणे, जर्दाळू हे चावून चावून खावे. हे पदार्थ रक्त व मांसधातुचे पचन व पोषण करणारे आहे व ज्या स्त्रिया मांसाहार घेतात त्यांनी मांसरस (मटणाचे सूप) सेवन करावे व मनाच्या दृष्टीने दूध + तूप + लोणी +बदाम + कोहोळ्याचा पाक ह्या पदार्थांचे सेवन विशेषत्वाने करावे.

मासानुमासिक काढा   

मांसधातु पाचक काढा, रक्तधातु पाचक काढा, मनुकांचे सूप

व्यायाम 

 चालणे, कमरेचे व्यायाम, श्वासाचे व्यायाम

मनाची व्यक्तीपोटावर हात ठेवून गर्भस्थ बालकाशी संवाद साधणे, रोज १०मिनिटे शांत वेळी (चांगले संगीत ऐकणे.)



६) सहावा महिनाषष्टे बुद्धि: 

हाव्या महिन्यात बुद्धीची उत्त्पत्ती होते. नख, अस्थि, त्वचा, केस हे भाव अन्य महिन्यापेक्षा जास्त प्रमाणात व्यक्त होतात म्हणून या महिन्यात भाजीत, आमटीत कोहोळ्याचा वापर विशेषत्वाने करावा. तसेच रात्री जेवताना आधी कोहळेपाक किंवा बदामाचा शिरा खावा. तसेच अस्थिधातु जास्त प्रमाणात व्यक्त होत असल्यामुळे अस्थिधातुपाचक व पोषण करणारी गुळवेल + सुंठ + चंदन इ. द्रव्ये तसेच शतावरी कल्प घालून सिद्ध केलेले दूध गर्भिणीस प्यावयास द्यावे. तसेच अस्थिधातुच्या पोषणाच्या दृष्टीने कडू रसाची योजना करावी. जसे- मेथीची भाजी, कॉफी (घरी केलेली) इ. सकाळी १ बदाम भिजत टाकून रात्री जेवणानंतर चावून खावा.

मासानुमासिक काढा

अस्थिधातुपाचक द्रव्ये (गुळवेल + सुंठ 4 चंदन), वसंत कल्प,डिंकाचे पाणी, मनुकांचे सूप

व्यायाम

कमरेचे सुख वज्रासन (जेवणानंतर), प्राणायाम, विटप जागेचाव्यायाम (तेथील स्नायूचे आकुंचन-प्रसरण करणे), खाली वाकूनकेर काढणे.

तसेच बरेचदा सहाव्या महिन्यात लघवीत जंतुसंसर्ग (Urine Infection) होण्याची भीती असते. सहाव्या महिन्यात मिठाचे सेवनहीकमी करावे व दुपारी जेवणापूर्वी २ काळ्या मनुकांचे सूप व रात्रीजेवणापूर्वी गोखरूच्या काढ्यात पाव चमचा गाईचे तूप घालून तेसेवन करावे. ह्यामुळे सूज किवा लघवीला आग, जळजळ होणे हीलक्षणे निर्माण होत नाहीत.


७) सातवा मास

॥सप्तमे सर्वांग प्रत्यय विभाग: प्रव्यक्त तरा:॥

सातव्या महिन्यापर्यंत सर्वसाधारणपणे सर्व अंगप्रत्यांगाचेविभाग अधिक स्पष्ट होतात. सर्व धातुंचे पोषण होते. गर्भाच्याअवयवांची वाढ ही ह्या महिन्यात परीपूर्ण होते म्हणूनच ह्या महिन्यातप्रसूती झाली तरीही मूल प्राकृत अवस्थेत जन्माला येते म्हणूनचवाताचे अनुलोमन होणे ह्या गोष्टीला ह्या महिन्यात प्राधान्य दिलेपाहिजे.

म्हणूनच दोन्ही जेवणात आधी पहिला घास गरम गरम भात + तूप + मीठ व नंतर पोळी + भाजी खावी व साधारणतः सातव्यामहिन्यापासून स्तन व स्तनाग्रे यांची स्वच्छता ठेवावी; तसेच पोट,मांड्या, स्तनांच्या अग्रांना चंदनबलालक्षादी तेल हलक्या हातानेलावावे म्हणजे चिरा पडत नाहीत. तसेच काही स्त्रियांची स्तनाग्रे हीआतल्या बाजूस असतात (Retroverted nipples). त्यानीदिवसापासून ५ मिनिटे तरी तेल लावून स्तनाग्रे बाहेर ओढावीत.त्यामुळे स्तनपान देणे सोपे जाते. तसेच बाह्य अपत्यपथ (Vagina Perineum) ह्या भागाची स्वच्छता ठेवावी. करण बालक यामार्गातूनच बाहेर येते व हा मार्ग अस्वच्छ किंवा विकारग्रस्त असल्यासबालकाला त्याची लागण होते. तसेच हात स्वच्छ धुऊन बाह्य योनी(अपत्यपथाचा) बाह्य मुखाशी तज्ञांच्या सल्ल्याने तिळाच्या तेलाचेबोट लावणे.


मासानुमासिक काढा

वसंत कल्प- वसंत कुःसुमाकर काढ्याची द्रव्ये वैद्यकीयसल्ल्यानेच द्यावी.

व्यायाम

सहाव्या महिन्यातील व्यायाम चालू ठेवणे.


८) आठवा मास:

“'अष्टमे स्थिरीभवति ओज। '

आठव्या महिन्यात ओज धातु (सातव्या महिन्यापर्यंत सर्वधातूंची उपपत्ती व वाढ झालेली असते या सर्व धातूंचा अति सारवानअसा ओज धातू आठव्या महिन्यात उत्पन्न होतो तरी तो स्थिर नसतो.)म्हणूनच आठव्या महिन्यात गर्भिणीला जपावे लागते व ओज स्थिरहोण्यासाठी ज्या बलाची आवश्यकता आहे. ते बल दूध + तूपाचेसेवन कफकाळात केल्याने (न्याहारीच्या वेळेत) केल्याने प्राप्त होते.तसेच मल-मूत्र-वाताचे अनुलोमन होऊन कटिभागातीलअवयव बलवान व कार्यक्षम होण्यासाठी मनुकांचे सूप (मार्ग वर्णनकेल्याप्रमाणे रात्री जेवणाअगोदर सेवन करावे.तसेच ह्या महिन्यात गर्भाशयाची पूर्ण वाढ झालेली असते.त्यामुळे त्याचा दाब मलाशयावर पडून मलसंचिती होत रहाते वपल:निसारण व्यवस्थित होत नाही. अशा वेळेस मनुकांचे सूप उपयोगपडते. ह्या महिन्यात प्रवास करणे, गर्दीतून जाणे ह्या गोष्टी टाळल्यापाहिजेत.

मासानुमासिक काढा

वसंत कल्प

व्यायामजेवणानंतर शतपावली करणे, प्राणायाम करणे.


९) नववा मास :

नवव्या महिन्यात गर्भाची वाढ अगदी पूर्ण होते व प्रसूतीसाठीयोग्य अशा अवस्थेत म्हणजेच डोके खाली (बहुतांशतः) व पाय वरगर्भ येतो.तसेच नववा महिना अर्धा संपल्यावर गर्भ हळूहळू कटिभागात(pelvis) खाली उतरायला लागतो.त्यामुळे खाली जडपणा वाटणे, वारंवार मूत्रप्रवृत्तीची भावनानिर्माण होणे, तसेच काहीसा अस्वस्थपणादेखील येतो. नवव्यापहिन्यात मलावरोधाची तक्रार बरेचदा आढळते म्हणून मांसाहार सेवनकरणाऱ्या स्त्रियांनी चोथा अधिक असलेले अन्न सेवन करावे. उदा.गव्हाचा कोंडा, पालेभाज्या तसेच मूग, मटकी, भाजून केलेल्या उसळतसेच काकडी + गाजर + टॉमेटो + बीट यांची कोशिंबीर दिवसातूनएकदा तरी सेवन करावी.तर शाकाहारी स्त्रियांनी दूध + तूप + लोणी ह्या दव्याचाअनिशेषत्वाने वापर करावा.तसेचमनुकांचेसूपहीसेवनकरावे.

गर्भिणीने गरोदर अवस्थेत स्वतःच्या पोषणाबरोबरच गर्भाचे योग्य पोषण होण्यासाठी, स्वत:चे बल टिकून राहण्यासाठी व रसधातूचा उपधातु स्तन्य निर्माण होण्याच्या दृष्टीने नऊ महिने गर्भिणीने ताजे, सकस, मनाला आवडणारे, सात्म्य म्हणजे आपल्या सवयीचे गोड, स्निग्ध आणि त्यात भूक वाढवणारी सुठ, आले, पुदीना, मिरी ही द्रव्ये घालून तयार केलेले पदार्थ सेवन करावे; तसेच रसधातू परिपोषक असा द्रव व मधुर आहार विशेषत्वाने सेवन करावा.





No comments:

Post a Comment

Foods That Support Baby Brain Development During Pregnancy

  During pregnancy, a mother’s diet plays a major role in the baby’s brain growth and nervous system development. Certain nutrients help imp...