Thursday, December 16, 2021

गर्भसंगीत

  



 

आपल्या बाळासाठी तो पोटात असतांना त्याच्या आईवडिलांनी ऐकलेलेगुणगुणलेलेगायलेले  ,अनुभवलेले गीत म्हणजेच गर्भसंगीत.

गर्भावर परिणाम करणारा सर्वात जवळचाओळखीचास्पष्ट  सुरेल आवाज म्हणजे त्याच्या आईचा आवाजत्या आवाजातील लकबी तो गर्भावस्थेतच ग्रहण करतोम्हणून बऱ्याच वेळा आपल्याला एकाच घरातल्या आवाजात साम्य दिसतेगर्भाला दुसरा तितकाच महत्त्वाचा  ओळखीचा आवाज म्हणजेत्याच्या आईच्या हृदयाची ठोकेठोक्यांचा हा रिदम कायम चालू असतोगर्भावस्थेत त्याला हा आवाज ऐकण्याशिवाय पर्यायच नसतो.आई जेव्हा रडणाऱ्या मुलाला खांद्यावर घेते  छातीशी धरते तेव्हा ते शांत होतेत्याचे कारण त्याने गर्भावस्थेत असताना ऐकलेला हृदय ठोक्यांचा तो आश्वासक आवाज रिदम त्याला धीर देतोआईच्या हृदय ठोक्याची गतीलय ही आईची मानसिक स्थिती दर्शविणारी असतेआईची शांतताणमुक्त चिंतारहीत किंवा भीती रहित मनस्थिती ही सुसंगत हृदय गती  सूर उत्पन्न करते तर चिडचिडीकाळजीग्रस्ततणावयुक्त मानस प्रकृती ही हृदय गतीमध्ये 'बेसूरनिर्माण करतेआईची ही मानसिक अवस्था या हृदय सुरातून गर्भाला कळते.

मन  संगीत यांचा अतिशय जवळचा संबंध आहेसंगीताचा तसेच ज्याला आपण 'तालम्हणतो त्या नादाचा पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होताेयोग्य संगीताच्या पार्श्वभूमीवर गाईम्हशींना पान्हा फुटतोत्या अधिक दूध देताततसेच कारखान्यातकार्यालयात संगीत हे कार्यक्षमता वाढवतेसंगीत हे तापलेले मन शांत करते तसेच ते शारीरिक दुःख सुद्धा हलके करू शकतेसंगीताचा परिणाम जर सर्व जीवसृष्टीवरही होतो तर मग गर्भातल्या बाळावर तो का होणार नाही?

 
गर्भ संगीताने मेंदूत बद्दल


प्राण्यांवर केलेल्या अनेक प्रयोगातून शास्त्रज्ञांना हे लक्षात आले की गर्भावस्थेत संगीत ऐकवल्या मुळे त्यांच्या मेंदूमध्ये बदल होतो न्यूरो जेनेसिस (Neurogenesis) ची प्रक्रिया वाढतेन्यूरो जेनेसिस म्हणजे चेता पेशींची निर्मितीत्यामुळे चेतापेशी वाढतात.सर्व सस्तन प्राण्यांमध्ये हिप्पोकॅम्पस म्हणून मेंदूमध्ये भाग आहेहिपोकॅम्पसमध्ये शॉर्ट टर्म मेमरीचे लॉंग टर्म मेमरीत रूपांतर होणेअवकाशीय दिकचालन (Spatial Navigation) करणे क्रिया होत असतातया भागाला इजा पोहोचल्यास स्मृती भ्रंशअल्झायमर सारखे आजार होऊ शकतात.गर्भ संगीतामुळे न्यूरो जेनेसिस ची प्रक्रिया वाढते त्यामुळे हिप्पोकॅम्पस मध्ये नवीन न्यूरॉन्सची निर्मिती होते आणि स्मृतीमध्ये वाढ होते.

मातेच्या पोटातील  आजूबाजूच्या वातावरणातील आवाजनाद त्याला ऐकू येतात.,त्याला गर्भातील बाळ प्रतिसादही देतेत्यामुळे बाहेरून ऐकवलेल्या संगीताचा अतिशय चांगला परिणाम गर्भावर होतो.संगीतामुळे गर्भावर कसा परिणाम होतो याची नोंद अनेक शास्त्रज्ञांनी प्रयोगा द्वारे केली आहेबाहेरून ऐकवलेल्या संगीताचा परिणामगर्भावस्थेतील बालकांवर होतोएका प्रयोगातबालवाडीत शिकवली जाणारी बालगीते गर्भांना ऐकवली असतात्यांचा 'टेम्पोरेल लोबजास्त प्रमाणात उद्यीपित झाल्याचे FMRIस्कॅनिंग मध्ये दिसलेगर्भसंगीतामधल्या लो फ्रिक्वेन्सी ला प्रतिसाद देतोतसेच त्याला बिथोबेन  रॉक यापैकी बिथोबेनचे संगीत आवडतेवादयापैकी तंतुवाद्ये त्याला अधिक आवडतातगर्भसंगीताच्या ताला वर हातपाय हलवितात किंवा उसळी सुद्धा मारतातगर्भ संगीतामुळे गर्भाच्या मेंदूला चालना मिळते.विशेषतः उजवा मेंदू हा उद्दीपित होतोत्याचा परिणाम मेंदूचे दोन्ही भाग (डावा मेंदू आणि उजवा मेंदूअधिक कार्यक्षम होतातत्यामुळे बाळाची निर्णय प्रक्रिया चांगली होतेएकांगी निर्णय होत नाहीतत्याची शिकण्याची क्षमताही वाढते.

जन्मपूर्व अवस्थेमध्ये संगीताला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.योग्य संगीत नियमित ऐकल्याने येणाऱ्या बालकाला भावी आयुष्यात पुढील फायदे होऊ शकतात.


बुद्धिमत्ताविशेषतः सांगीतिक बुद्धिमता वाढू शकते.

सृजनशीलताकल्पनाशक्ती वाढते.

संगीताच्या धड्यांचा परिणाम डाव्या मेंदूतील टेम्पोरेल लोब उद्दीपित करण्यात होतो त्यामुळे चांगले लक्षात राहू शकतेव्हर्बल मेमरीशब्द आठवण्याची क्षमता वाढू शकत

 या सर्व वैज्ञानिक पार्श्वभूमीवर आपले भारतीय शास्त्रीय संगीत हे अतिशय प्रभावी ठरू शकेलकारण भारतीय संगीताचा पाया 'शास्त्रीयआहेत्याला हजारो वर्षांची परंपरा आहे

 बाळ आईच्या पोटात असताना सुद्धा त्याला 'आवाज', नाद उद्दीपित करतोत्याला सातव्या महिन्यात आपल्यासारखे कानाने ऐकू येतेपरंतु त्या अगोदर सुद्धा त्याला संगीताचा नाद उद्दीपित करतोफक्त ते उद्दीपन कानातून  होता बोन कंडक्शनच्या माध्यमातून होतेत्याला ताल म्हणजे रिदम कळतोआवडतो.
 

गर्भिणीने सुमधुरअर्थपूर्णमनाला प्रिय असे संगीत ऐकावेबासरीसतारसनई वाद्याचे सुर ऐकावेवेदमंत्रांचे पठण वातावरण पवित्र ठेवण्यास मदत करतातउदाश्रीसूक्तपुरुष सूक्तभगवद्गीताथोर पुरुष यांचे चरित्र भगवंताबद्दलची प्रशंसा यांचे श्रवण करावे


प्रसिद्ध ब्रिटिश व्हायोलिनवादक येहुदी मेनुईन आपल्या संगीतातील ज्ञानाचे श्रेय जन्मपूर्व अवस्थेत मिळविलेल्या ज्ञानाला देऊन टाकतोसंगीताचे हे धडे आईकडून मिळाले नाहीत तर काय होतेयावरही संशोधन झाले आहेफ्रेंच शास्त्रज्ञ डॉअलफिड दामास्तिस याने गाणाऱ्या पक्षांच्या अंड्यावर प्रयोग केलेत्याला असे आढळले कीजन्म देणाऱ्या पक्षी मातेने गाणे गायले नाही तर अंड्यातून बाहेर पडणाऱ्या पिलाला सुद्धा गाता येत नाही अशी ही गाण्याची सुरेल कथा.

 

आधिक माहिती करता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

 https://youtu.be/G0aF6G8CmxI

No comments:

Post a Comment

Foods That Support Baby Brain Development During Pregnancy

  During pregnancy, a mother’s diet plays a major role in the baby’s brain growth and nervous system development. Certain nutrients help imp...